Thursday, August 11, 2022
Homeबॉलिवूडब्रेकिंग : अश्लिल चित्रपट चित्रीत करण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि...

ब्रेकिंग : अश्लिल चित्रपट चित्रीत करण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अटक

spot_imgspot_imgspot_imgspot_img

मुंबई : अश्लिल चित्रपट चित्रीत केल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी जवळपास ७ ते ८ तास चौकशी केल्यानंतर संध्याकाळी कुंद्राला अटक करण्यात आली.

एका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन राज कुंद्रा यांना ही अटक केली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये या प्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अनेक वादात सापडले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची यांच्यासोबत राज कुंद्राचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. ईडीने यासंबंधी कुंद्रा यांना नोटीसही दिली होती. पण कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय