Saturday, October 12, 2024
Homeजिल्हाशरद पवारांवर पोस्ट करणारी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, आक्षेपार्ह पोस्ट भोवणार?

शरद पवारांवर पोस्ट करणारी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, आक्षेपार्ह पोस्ट भोवणार?

मुंबई : केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथून ताब्यात घेतले आहे. तिचा शोध ठाणे गुन्हे शाखा करत होती. आता ठाणे गुन्हे शाखेची टीम रवाना झाले असून तिला नवी मुंबई पोलिसांकडून ठाणे गुन्हे शाखा ताब्यात घेणार आहे. सध्या कळंबोली इथे असलेल्या तिच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नवी मुंबई पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर केतकी हिला ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले जाणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली.

ब्रेकिंग : अभिनेत्रीची शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, संतापाची लाट

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, नागपूर येथे रिक्त पदासाठी भरती, असा करा अर्ज !

मेगा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी


संबंधित लेख

लोकप्रिय