Wednesday, April 24, 2024
Homeबॉलिवूडअभिनेत्री कतरिना कैफने लग्नानंतर केली ‘ही’ घोषणा

अभिनेत्री कतरिना कैफने लग्नानंतर केली ‘ही’ घोषणा

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने चाहत्यांसाठी एक घोषणा केली आहे. अभिनेत्री कतरिनाला मोठ्या पडद्यावर पाहून आता खूप दिवस झालेत. तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात आता कतरिनाने तिच्या चाहत्यासाठी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

कतरिना कैफचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असताना कतरिना कैफने लग्नानंतरचा तिचा पहिला चित्रपट रिलीज करण्याची घोषणा केली आहे. कतरिनाच्या या चित्रपटाचे नाव ‘फोन भूत’ आहे. कतरिना कैफने सोशल मीडियावर एका खास पोस्ट शेअर करत तिचा आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. कतरिनाने लिहिले की, ‘फोन भूतच्या जगात तुमचे स्वागत आहे. 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेसृष्टीत दाखल होत आहे.

कतरिना कैफच्या या चित्रपटात कतरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचा २२ सेकंदाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र या टीझरवरुन सिनेमाच्या कथानकाचा कोणताच अंदाज लावला जाऊ शकत नाही. यातील कतरिनाचा हा नवा लूक सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. परंतू कतरिना आता भूत बनून चाहत्यांना घाबरवणार की काय अशा चर्चा सुरु आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय