Monday, September 25, 2023
HomeCrimeजम्मू काश्मीर येथे शूटिंग संपवून घरी परत असताना अभिनेता इमरान हाश्मी यांच्यावर...

जम्मू काश्मीर येथे शूटिंग संपवून घरी परत असताना अभिनेता इमरान हाश्मी यांच्यावर जमावाकडून दगडफेक !

काश्मीर : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये एका चित्रपटाचे शिटींग सुरूर आहे. हे चित्रपटाचे शूटिंग पहलगाममध्ये सुरू आहे. दरम्यान इमरान हाश्मी शूटिंग संपवून सेटवरून बाहेर पडला, तेव्हा काही लोकांनी त्याच्यावर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.

चित्रपटाचे शूटिंग संपवून अभिनेते इमरान हाश्मी फिरायला बाहेर पडले, त्यानंतर काही लोकांनी इमरान हाश्मी आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून दगडफेक करणाऱ्यांवर कलम 147, 148, 370, 336, 323 लावण्यात आले आहे.

इम्रानने श्रीनगरच्या एसपी कॉलेजमध्ये शूटिंग केले. शूटिंग संपवून इम्रान निघाला तेव्हा त्याने वाट पाहणाऱ्या चाहत्यांकडे पाहिले नाही. त्यामुळे लोक संतप्त झाले. यावेळी एका चाहत्याने सांगितले की, तो अभिनेत्याला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी उभा होता. मात्र, इमरान हाश्मीने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याचबरोबर दगडफेकीच्या या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत सई ताम्हणकर आणि झोया हुसैन देखील दिसणार आहेत. या चित्रपटाशिवाय इमरान आणखी अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारसोबत सेल्फी या चित्रपटातही ती दिसणार आहे. याशिवाय सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटात इमरान हाश्मीही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

सोर्स My Mahanagar

संबंधित लेख

 


लोकप्रिय