Wednesday, February 12, 2025

दिल्ली पोलिसांकडून बाबा कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक आणि सुटका

चालकांचे प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरु राहणार : बाबा कांबळे

विविध मागण्यासाठी देशभरातील चालक दिल्लीत आक्रमक

पिंपरी चिंचवड : देशभरातील चालक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडून देखील कोणी दखल घेत नाही. त्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार चालकांनी घेतला.पण तरीही पोलिसांनी अटक केली, गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नसल्याचा निर्धार ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला. जोपर्यंत देशातील २५ कोटी चालकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसून हे आंदोलन यापुढेही चालूच राहिल असे बाबा कांबळे म्हणाले.


आपल्या मागण्यांबाबत वारंवार निवेदन देऊन, आंदोलन करून देखील केंद्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. त्याच्या निषेधार्थ ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतर येथे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. परंतु शेतकरी आंदोलनाच्या धर्दीवरती दिल्ली येथे 144 लागू असल्यामुळे आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. परिणामी विविध राज्यातून आलेले चालक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. व प्रत्येकांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये बंद केले रात्री उशिरा बाबा कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.

या आंदोलनात दिल्ली येथे देशभरातील 28 राज्यातील दोन हजार पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांना तसेच महिला कार्यकर्त्यांना देखील अटक करून रात्री उशिरा सुटका करण्यात आली

सर्व कार्यकर्त्यांची सुटका झाल्यानंतर बाबा कांबळे म्हणाले, केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा मागे घेण्याबद्दल अध्यादेश जाहीर केला आहे. त्या निर्णयाचे स्वागत करतो. परंतु आमच्या इतर मागण्यांबद्दल वारंवार आंदोलन करून देखील सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. आमचे प्रश्न व आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही. यामुळे देशभरातील आलेले सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. देशभरामध्ये 25 कोटी चालकांची संख्या असून त्यासाठी राष्ट्रीय चालक आयोग, सामाजिक सुरक्षा देण्यासाठी बोर्ड, ड्रायव्हर डे, ड्रायव्हर साठी कामाचे तास योग्य वेतन तसेच इतर विविध मागण्यांचा विचार होणे आवश्यक असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles