Thursday, March 28, 2024
Homeजिल्हामंचर येथे गोळीबार करून खून करणाऱ्या गुन्ह्यातील संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या...

मंचर येथे गोळीबार करून खून करणाऱ्या गुन्ह्यातील संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

जुन्नर /आनंद कांबळे : मंचर पोलिस स्टेशनचे हद्दीत एकलहरे गावच्या हद्दीत ओंकार उर्फ राण्या बाणखेले याची डोक्यात पिस्तुल ने गोळी मारून हत्या केल्याप्रकरणी मंचर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल होती. 

सदर प्रकार गंभीर असल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस  अधीक्षक अभिनव देशमुख यांनी आदेश दिल्याने सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्याकडून समांतर तपास चालू होता. 

सदर गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा करून फरार असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गुप्त बातमी द्वारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी रामा जाधव हा राजगुरुनगर खेड येथे येणार आहे. व नंतर परराज्यात पळून जाणार आहे. 

मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे टीम ने खेड एसटी स्टँड येथून एक संशयित इसम ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राम सुरेश जाधव, वय 22 वर्ष, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे.असे सांगितले. तरी त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी लंभाते यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सपोनि. नेताजी गंधारे, पोसई अमोल गोरे, पोसई रामेश्वर धोंडगे, सहा.फौजदार पठाण, पो. हवा. दिपक साबळे, पो. हवा. हनुमंत पासलकर, पो.हवा. विक्रम तापकिर, पो. हवा. राजू मोमीन, पो. ना. संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, पो. कॉ. निलेश सुपेकर, पो. कॉ. बाळासाहेब खडके, चालक सहा. फौज. राजापुरे, प्रमोद नवले केली आहे.


संबंधित लेख

 


लोकप्रिय