Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुणे : ‘खेड’चा पप्पू वाडेकर आणि ‘मंचर’ राण्या उर्फ ओंकार बाणखेले यांच्या खुनातील आरोपीला अटक

---Advertisement---

---Advertisement---

मंचर / रवींद्र कोल्हे : राजगुरूनगर (खेड) येथील पप्पू वाडेकर याचा वर्चस्ववादातून खून झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी मोबाईलवर स्टेट्स ठेवल्याचा वादातून मंचर येथील कुविक्यात राण्या उर्फ ओंकार बाणखेले याचा २ ऑगस्ट रोजी आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे डोक्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन्ही प्रकरणातील एक सराईत फरार आरोपी पवन सुधीर थोरात (वय २२,रा.जुना चांडोली ता.आंबेगाव ) याला मंचर बस स्थानक शिवारात संशयित रित्या फिरतांना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव पवन सुधीर थोरात असे सांगितले. यापूर्वी त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असल्याची माहिती मंचर पोलिसांनी दिली. ही कारवाई लोकल क्राईम ब्रँच ( LCB) आणि मंचर पोलिसांनी केली.

सराईत आरोपी पवन थोरात याच्यावर विविध पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल असून, गुन्हा रजिस्टर नं.४५९/२०२१ नुसार भारतीय दंड विधान कलम ३०२, १२०(ब), ३४ सह शस्र अधिनियम १९५९ चे कलम ३(२५)(२७) अन्वये भारतीय दंड विधान कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, २०१ अन्वये गंभीर स्वरूपाचा संबधित गुन्हा दाखल झाला आहे. पवन थोरात याला अटक केल्याने आणखी गुन्हे उघडकीस येतील असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान ही कारवाई करण्यासाठी पुणे जिल्हा ग्रामिण पोलिस अधिक्षक  डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी लंभाते, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस अधिकारी पद्माकर घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस हवालदार दीपक साबळे, हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, दगडू वीरकर, पोलिस मित्र प्रसाद पिंगळे यांनी परिश्रम घेतले.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles