Thursday, August 11, 2022
Homeराजकारणभाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण, फडणवीसांचाही अपमान ब्राह्मण महासंघाचा आरोप

भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण, फडणवीसांचाही अपमान ब्राह्मण महासंघाचा आरोप

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुणे : नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. दिल्लीतून आलेल्या पक्षाच्या आदेशानूसार देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मात्र आता ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी मुख्यमंत्रीपद गुण पाहून द्यायचे की जात पाहून, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच हा फडणवीसांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

आनंद दवे म्हणाले, पुन्हा एकदा केवळ ब्राम्हण मुख्यमंत्री नको म्हणून जर त्यांना संधी नाकारली असेल तर भाजप सुद्धा जातीय राजकारण करतो हे सिद्ध झाले आहे. मी सरकार मध्ये नसणार असे जाहीर पणे सांगितल्यानंतरही सक्ती करून त्यांना शपथ घेण्याचा जाहीर आदेश देऊन भाजपने देवेंद्रजी यांचा अपमानच केला आहे. हे सरकार दिल्लीच्या व्हेंटिलेटरवरच राहील हे पहिल्याच दिवशी राज्याला दाखवून दिले असल्याचे दवे यांनी सांगितले.

ब्राह्मण असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले असून भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे. आधी नितीन गडकरी यांना पतंप्रधानपदाच्या शर्यतीतून हटवलं आणि आता देवेंद्र फडणवीस यांना बळजबरीने उपमुख्यमंत्रीपद देत खच्चीकरण केलं, असं डॉ गोविंद कुलकर्णी म्हणाले.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय