मुंबई : ‘कच्चा बदाम’ गाणे गाऊन रातोरात सोशल मीडियावरून प्रसिध्द झालेल्या भुबन बड्याकर यांचा रस्ता अपघात झाला आहे यात ते जखमी झाले आहे.
भुबन यांनी एक जुनी कार घेऊन चालवण्यास शिकत होते. त्यावेळी त्याचा अपघात झाला. अपघातानंतर भुबन बड्याकर यांना पश्चिम बंगालमधील बीरभूममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले, या अपघातात त्यांच्या छातीला आणि दोन ठिकाणी जखम झाली आहे, सध्या ते रुग्णालयात असून त्यांची तब्बेत सुधारत असल्याचे डॉक्टरांना सांगितले आहे.
भूबन बड्याकर हे पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी गावातील राहणारे आहेत. ते कच्चा बदाम (शेंगदाणे) भंगार वस्तूंच्या बदल्यात विकायचे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.
‘कच्चा बदाम’ हे गाणे गाऊन ते शेंगदाणे विकण्यासाठी सायकलने दूरच्या गावी जायचे. रोज 3-4 किलो शेंगदाणे विकून 200-250 रुपये कमावायचे. त्याचे गाणे लोकांनी ऐकल्यानंतर लोकांनी हे गाणं बनवून सोशल मीडियावर टाकलं. या गाण्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, यातून त्यांना नवीन ओळख मिळाली.
दरम्यान, हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका म्युझिक कंपनीने त्यांना लाखो रुपयांचा चेक दिला, तसेच त्यांना अनेक टीव्हीच्या कार्यक्रमातून संधी देण्यात आली.