माहूर : श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथील कर्मचाऱ्यांच्या रास्त व कायदेशीर मागण्या तातडीने सोडवाव्या म्हणून रेणुका देवी टी पॉईंट येथे माहूर गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अखिल भारतीय किसान सभा व एस.एफ.आय. च्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करून संस्थानचे सचिव व वादग्रस्त विश्वस्तांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
सीटू संलग्न मजदूर युनियनच्या ७० कर्मचाऱ्यांचा बैठा सत्याग्रह रेणुका मातेच्या पहिल्या पायरी जवळ दि.१० जानेवारी पासून अखंड सुरू आहे. श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथे सिटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन ची शाखा मागील चार वर्षांपासून कार्यान्वित आहे. यापूर्वी दोन वर्षा अगोदर असाच पाच दिवसाचा सत्याग्रह संस्थानातील ७० कर्मचाऱ्यांनी केला होता. तेव्हा तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट तथा रेणुका देवी संस्थान चे सचिव अभिनव गोयल (भा.प्र. से.) यांनी युनियन चे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड व स्थानिक समितीचे अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव यांना लेखी आश्वासन देऊन तेव्हाचा सत्याग्रह थांबविला होता.
तसेच १६ फेब्रुवारी २०२० रोजी विशेष सभा घेऊन संस्थान च्या सर्व कर्मचाऱ्यांना समय वेतन श्रेणी नुसार कायम आदेश देण्यात येतील व किमान वेतनाची पूर्तता करण्यात येईल असे सुस्पष्ट शब्दात लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले आहे. परंतु दोन वर्षे संपून गेली तरीही लेखी आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळे संस्थानच्या ७० कर्मचाऱ्यांनी पुन्हा दि. १० जानेवारी पासून गडाच्या पायथ्याशी कडाक्याच्या थंडीत बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.
सत्याग्रहाच्या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन लेखी स्वरूपात पाठिंबा दर्शविला आहे. परंतु संस्थानचे सचिव किर्तीकिरण पुजार (भा. प्र. से.) हे युनियनला आम्ही जुमानत नाही अशी भूमिका घेताना दिसत आहेत. एकंदरीतच देशातील व महाराष्ट्रातील अनेक देवस्थानामध्ये सीटूच्या शाखा कार्यान्वित आहेत आणि माहूर देवस्थानातच कर्मचाऱ्यांना संघटना का बांधता येत नाही हे संशोधनाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. एकंदरीतच संस्थान च्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्या रास्त असून कायदेशीर आहेत. त्या तातडीने सोडविण्यात याव्यात म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !
झालेल्या चक्का जाम आंदोलनाची दखल संस्थानच्या व्यवस्थापनाने घेतली नाहीतर तर सीटू च्या भातृभावी संघटना नांदेड, किनवट व माहूर येथे अमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.
रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे कॉ.शंकर सिडाम, कॉ.किशोर पवार, कॉ.प्रल्हाद चव्हाण, दिनेश गावंडे, कॉ.राजकुमार पडलवार, आंबादास आडे, चंद्रभान निलेवाड, संजय मानकर, श्याम आडे, राजू पिसरवाड, दिपक ठाकूर तर एसएफआयच्या वतीने कॉ.प्रफुल कऊडकर, कॉ.विशाल नरवाडे, अभि खंदारे, आदींनी केले असून सीटूचे कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.कालीदास सोनुले, कॉ.करवंदा गायकवाड यांचाही सहभाग होता. तसेच आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.मारोती करपते, कॉ.रमेश मेश्राम, कॉ.वसंत राठोड, कॉ.बाबू दोहिले, कॉ.सुनिल चांदेकर आदींनी प्रयत्न केले आहेत.