पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२९-राज्यसरकारने मुंबई पुणे द्रुतगती महमार्गावर एप्रिल २०२३ पासून १८ टक्के टोल वाढ केली आहे.
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली किवळे येथे महामार्गावर आज टोलवाढीचा निषेध करण्यात आला.
पुणे एक्सप्रेस वेवर टोल वाढल्याने आता प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. वैयक्तिक वाहन वापरकर्त्यांना १ एप्रिलपासून १८ टक्के वाढीव टोल टॅक्स मूळे खासगी बस आणि कॅबचे भाडे वाढणार आहे.
मालवाहतुकदार,कारचालक यांना मोठा भुर्दंड बसणार आहे.
२००८ च्या महामार्गशुल्क आकारणी नियमानुसार स्थानिक परिस्थितीनुसार टोल आकारणी केली पाहिजे.
महामार्ग निर्मिती प्रकल्प खर्च व देखभाल खर्च यांच्यानुसार टोल वसुली जाचक असता नये.
मात्र टोलवसुलीची कंत्राटदार कंपन्यांच्या लाभासाठी टोल दरवाढ केली आहे,असा संतोष इंगळे यांनी आरोप केला आहे.
आंदोलनास संतोष इंगळे,यशवंत कांबळे,मीनाताई चंद्रमणी जावळे,सरोज कदम,ज्योती शिंदे,संतोषी नायर,ब्रह्मानंद जाधव,हारून अन्सारी,राहुल नाईक,संजय मोरे,सचिन पवार,अमर डोंगरे,कमलेश रनवरे,
रोहित सरनोबत,अजय द्विवेदी,अशोक शेडगे,दिलीप खुडे,दिलीप कुमार,विनोद सरोज,संजय मोरया,सुरेंद्र कांबळे आणि आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
---Advertisement---
---Advertisement---
टोलवाढीच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन
---Advertisement---
- Advertisement -