Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

‘आपले सरकार’ पोर्टल १४ एप्रिल पर्यंत राहणार बंद

मुंबई, दि.९ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) दरम्यान ‘आपले सरकार’ (Aaple Sarkar) पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे.

---Advertisement---

या कालावधीत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ (Aaple Sarkar) वरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी अनुपलब्ध राहतील. (हेही वाचा – मोठी बातमी : मनसे पक्षाची मान्यता रद्द होणार ? राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका)

दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे, नागरिकांनी, आपले सरकार सेवा केंद्र/ सेतू केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी तसेच शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी आपापल्या सेवा संबंधित कामांचे नियोजन पूर्वीच करावे, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांनी केले आहे. (हेही वाचा – महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटातील दृश्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप)

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles