Wednesday, February 12, 2025

‘आप’ ची स्वराज्य यात्रा बनणार, पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचा आवाज

शिव छत्रपतींना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य हीच ‘आप’ची राजकीय भूमिका

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.३१
– छत्रपती शिवरायांचा ३५० स्वराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायाचे भक्तीपीठ पंढरपूर व स्वराज्याचे शक्तीपीठ रायगड पर्यंत ७८३ किमीची स्वराज्य यात्रा आम आदमी पार्टीने सूर केली आहे. आम आदमी पार्टीने दिल्ली,पंजाब निवडणुकीत सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा राजकीय विचार दिला आहे. आम आदमी पार्टीचा विचार देशभर पसरत आहे.शिवरायांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी ‘आप’चे व्हिजन डाक्युमेंट पक्ष कसा पूर्ण करेल याची माहिती जनतेला देण्यासाठी स्वराज्य यात्रा सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती ‘आप’ चे पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते राज चाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.



आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा २८ मे ते ६ जुन पर्यंत महाराष्ट्राचे भक्तीस्थळ पंढरपूर ते शक्तीस्थळ किल्ले रायगड येथे यात्रेचा समारोप होणार असून दि ३ व ४ जून रोजी हि यात्रा पिंपरी चिंचवड शहरातून जाणार आहे. आपचे राष्ट्रीय संघटन सचिव संदीप पाठक आणि महाराष्ट्र राज्य सह-प्रभारी गोपाल इटालिया याच्या मार्गदर्शनाखाली आजच्या स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य यात्रेचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या समजुन त्यांना वाचा फोडणे आणि दिल्ली आणि पंजाबच्या जनतेसारखं आम आदमी पार्टीला मतदान केल्यावर पक्ष महाराष्ट्र राज्यात काय बद्दल करू शकतो हे पटवण्यासाठी पक्षाची पुर्ण कार्यकारणी जमिनीवर काम करत आहे. स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आपने महाराष्ट्रामध्ये संघटन विस्ताराची मोहीम हाती घेतली आहे.



दि. ३ व ४ जून रोजी पिंपरी चिंचवड शहरात असणार आहे. . या दोन दिवसांमध्ये स्वराज्य यात्रेमध्ये पदयात्रा जनसभा रॅली अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या निमित्ताने पिंपरी चिंचवड मधील प्रश्नांची चर्चा जनतेसमोर करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील टक्केवारीचा राजकारण आणि प्रशासकांची मनमानी, महापालिकेची मालमत्ता आणि नाट्यगृह, दवाखाने यासारख्या सेवांचे खाजगीकरण, शहरातील पाणी टंचाई आणि टँकर माफीया, मिळकतधारकांना उपयोगकर्ता शुल्काचा भुर्दंड स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारे प्रशासकीय राज, विस्कळीत वीजपुरवठा, शिक्षणाचे बाजारीकरण शहरातील नद्या आणि नालेसफाईच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळ, पुणे लोणावळा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरणाची मागणी, सोसायटीतील कचऱ्याची समस्या, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची व्यथा आदी प्रश्नांना स्वराज्य यात्रेत वाचा फोडणार असल्याचे शहर प्रवक्ते राज चाकणे यांनी सांगितले.



स्वराज्य यात्रेचा पिंपरी चिंचवड मधील प्रवास आणि कार्यक्रम

३ जुन, दुपारी १ वाजता जुनी सांगवी येथे रॅली
३ जुन , दुपारी ३.३० वाजता संत तुकारामनगर येथे पदयात्रा
३ जुन , संध्याकाळी ४.४५ वाजता जाधववाडी येथे रॅली
३ जुन , संध्याकाळी ६.३० वाजता आकुर्डी येथे जनसभा
४ जुन , सकाळी ८ वाजता भक्ती-शक्ती येथे रॅली
४ जुन , सकाळी ९ वाजता रावेत येथे पदयात्रा असा आहे.



राज चाकणे यांनी सांगितले की,स्वराज्य यात्रा पुढे पनवेल मार्गे रायगडकडे मार्गक्रमण करेल. भविष्यात आम आदमी पार्टी ला जनतेने संधी दिली तर १००% सर्व दिलेल्या वचन पक्ष कसा पुर्ण करेल या संदर्भात स्वराज्य यात्रा जनजागृती सोबत नागरिकांना नवीन संधीचं सोनं करा ‘आप’ला साथ दया, अशी साद घालत स्वराज्य यात्रा किल्ले रायगडावर पोहोचणार आहे. या पत्रकार परिषदेस आपचे शहर प्रवक्ते राज चाकणे, शहर उपाध्यक्ष संतोष इंगळे, दत्तात्रय काळजे, महिला आघाडी अध्यक्ष सिताताई केंद्रे, मीडिया समन्वयक स्वप्निल जेवळे उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles