Tuesday, September 17, 2024
Homeराजकारण'आपचे' पुढील टारगेट गुजरात ; मोदींची चिंता वाढणार..!

‘आपचे’ पुढील टारगेट गुजरात ; मोदींची चिंता वाढणार..!

गुजराथ : गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष भाजपाला पराभूत करेल असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

ते गुजरातच्या भरूच येथे बोलत होते. गुजरातमधील भाजपा सरकारने पेपरफुटींबाबत जागतिक विक्रम केला आहे. शाळा व रुग्णालयांच्या स्थितीकडेही दुर्लक्ष केलं आहे. पण आम आदमी पक्ष या सर्व समस्या सोडवून जनतेला खरा विकास दाखवून देऊ, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

केजरीवाल यांनी गुजरात भाजपाला थेट आव्हान दिलं आहे. “भाजपा आम्हाला घाबरत असल्यामुळेच गुजरातच्या निवडणुका लवकर होतील असं मी ऐकलं आहे. आम्ही दिल्लीत आणि नुकतंच पंजाबमध्ये सरकार स्थापन केलं. आता गुजरातची वेळ आली आहे. भाजपाला वाटतं की आम्हाला डिसेंबरपर्यत वेळ मिळाला तर गुजरातची जनता आम आदमी पक्षाकडे वळेल. पण तुम्ही निवडणुका आता घ्या किंवा सहा महिन्यांनी घ्या. तुमचा पराभव निश्चित आहे”, असं रोखठोक आव्हान केजरीवालांनी भाजपाला दिलं आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 50000 हजार रूपये पेक्षा जास्त पगार

10 वी / ITI उत्तीर्णांना संधी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांची मोठी भरती

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

संबंधित लेख

लोकप्रिय