Saturday, April 1, 2023
Homeशहरआम आदमी पार्टीच्या संकल्प सप्ताह ची जोरदार सुरुवात 

आम आदमी पार्टीच्या संकल्प सप्ताह ची जोरदार सुरुवात 

आपच्या दोन शाखांचे उद्घाटन करून संकल्प सप्ताहाची सुरूवात

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड च्या वतीने 21 ते 27 जानेवारी दरम्यान संकल्प सप्ताह राबवण्यात येणार असून त्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

आज दिनांक 21 जानेवारी रोजी मुकाई चौक रावेत येथे संतोषी नायर यांच्या किवळे रावेत आपच्या शाखेचे तसेच काळेवाडी येथील संजय मोरे यांच्या काळेवाडी- नढेनगर शाखेचे उद्घाटन आपच्या पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. आपचे चिंचवड विधानसभेचे कार्याध्यक्ष यशवंत कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

या  वेळी शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, शहर प्रचारप्रमुख राज चाकणे, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे, शहर संघटन प्रमुख मनोहर पाटील, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष ब्रम्हानंद जाधव,  शहर महिला प्रमुख ज्योती शिंदे, सरोज कदम, पूनम गीते, संतोषी नायर, सचिन पवार, सुरेश भिसे, रोहित सरनोबत, गोविंद माळी, कुणाल वक्ते, शशिकांत कांबळे, राहुल वाघमारे, संजय मोरे, संतोष इंगळे, यल्लपा वालदोर, ओमीन गायकवाड, स्वप्नील जेवळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Lic

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय