पिंपरी चिंचवड : पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून पंजाबमधील विजयाचा मोठा जल्लोष केला.
आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे म्हणाले, ‘आम आदमी पार्टीचा विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे. अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेल चा विजय आहे. आपच्या उमेदवारांनी पंजाब आणि गोवामध्ये बड्या बड्या प्रस्थापित नेत्यांना पराभूत करून देशात सर्वसामान्यांचा विकासाचा पायंडा रचला आहे.
आम आदमी पार्टी आता देशात प्रमुख विरोधी पक्ष आणि भाजप ला टक्कर देणारा पक्ष म्हणून समोर आला आहे. आम आदमी पार्टीच्या या विजयाने येणाऱ्या काळात जातीधर्माच्या मुद्द्यावरून शिक्षण, आरोग्यासारख्या मूलभूत मुद्द्यावर लढल्या जातील, असे बेंद्रे यांनी पिंपरीत सांगितले.
– क्रांतिकुमार कडुलकर
पंजाब व्यतिरिक्त सगळीकडे भाजप चे कमळ उमलले !