पाच लाख नवीन कार्यकर्ते जोडण्यासाठी ‘आप’ची स्वराज्य संवाद मोहीम
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : नुकत्याच आठशे किलोमीटर प्रवास करीत आठ जिल्ह्यात पदयात्रा आणि सभामार्गे संवाद साधत आम आदमी पार्टीने पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा पूर्ण केली आहे आणि आता सर्वसामान्य व्यक्तीशी संपर्क साधत पक्षांमध्ये पाच लाख नवीन सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘स्वराज्य संवाद’ नावाचा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे असे आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे आणि अनुप शर्मा यांनी सांगितलं. आप ने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर ही पश्चिम महाराष्ट्रातील स्वराज्य यात्रा काढून विविध राजकीय पक्षांचे लक्ष वेधले आहे.

आता त्याचाच पुढचा टप्पा म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांशी छोट्या कोपरा सभा घेत, संवाद साधत नवीन कार्यकर्ते जोडण्याची मोहीम राबवली जाणार आहे. या कोपरा सभेमध्ये या संवाद यात्रेचे महत्त्व तसेच दिल्ली आणि पंजाब मधील दिलेल्या कामांची माहिती व महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आम आदमी पार्टीचे महत्त्व याविषयी स्थानिक कार्यकर्ते माहिती देतील व सदस्य नोंदणी करतील अशी माहिती उपाध्यक्ष दत्तात्रय काळजे यांनी सांगितली .
गुजरात मधील सुरतच्या महानगरपालिकेमध्ये २३ नगरसेवक निवडून आणण्याची किमया करणारे युवा नेते व महाराष्ट्राचे सह प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवली जाणार आहे. गेले वर्षभर महाराष्ट्रामध्ये शिंदे व फडणीस सरकार सत्तेत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघेही जनतेचे प्रश्न बाजूला ठेवत एकमेकांची उणीदूणी काढण्यामध्ये गर्क आहेत. पालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका न झाल्यामुळे सर्व कारभार प्रशासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणे अवघड झाले आहे. यामुळेच आम आदमी पार्टी जनसंवाद मोहीम राबवत असल्याचे यावेळेस अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष वहाब शेख यांनी सांगितलं.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रत्येक प्रभाग / विधानसभा चं नियोजन पाहुन, रोज संध्याकाळी कोपरा सभा घेतल्या जाणार आहेत.सोबत सभासद नोंदणी पण केली जाणार आहे . 12 आणि 13 जुन मध्ये पिंपरी चिंचवड शहरात नवी सांगवी , जुनी सांगवी , पिंपरी गाव , फुले नगर , या ठिकाणी कोपरा सभा घेऊन स्वराज्य संवाद मोहीम नुसार दिल्ली मॉडेल ची माहिती संतोष इंगळे यांनी दिली.पंजाब मॉडेल ची माहिती डॉक्टर अमर डोगरे यांनी दिली आणि स्थानिक प्रश्ना वर कमलेश रणावरे आणि यशवंत कांबळे यानी मार्गदर्शन केले.
आजोळघरी माऊलींचे पालखी सोहळ्याचा पाहुणचार ; हरिनाम गजरात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीकडे
पालखी मार्गावर व्यापक स्वच्छता अभियान
PCMC-व्हिडीओ न्यूज : अक्षय भालेराव, गिरीधारी तपघाले हत्येचा निषेधार्थ विराट मोर्चा
