आंबेगाव खुर्द :आम आदमी पार्टी आणि एच. व्ही.देसाई आय हॉस्पिटल, पुणे यांच्यातर्फे बुधवार (ता. 8) शनी नगर चौक भैरवनाथ मंदिर, मागे ढमाले फूड मॉल जांभुळवाडी रोड येथे,सकाळी 9: 30 ते 1.30 या वेळेत मोफत डोळे तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती आपचे कार्यकर्ते आणि मर्जी संघटनेचे पुणे जिल्हाचे समन्वयक प्रशांत कांबळे यांनी दिली.
या वेळी डोळे तपासणी, लांबचे-जवळचे कमी दिसणे, सतत डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, अल्पदरात चष्मे वाटप अशी मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना मोतीबिंदू असेल अशा रुग्णांची मोफत व अल्पदरात शस्त्रक्रिया केली जाईल.
बीपी,शुगर यांचे देखील तपासणी अल्प दरात करण्यात येईल, या शिबिराचा हनुमान नगर,शनी नगर, इंद्रायणी नगर, बोले नगर, लिपाने वस्ती, परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आम आदमी पार्टी कडून करण्यात आले आहे.
आम आदमी पार्टी आणि एच. व्ही.देसाई आय हॉस्पिटल, पुणे यांच्यातर्फे मोफत डोळे तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप शिबि राचे आयोजन
- Advertisement -