Friday, April 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआपच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधववाडी येथे कोपरा सभा संपन्न

आपच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधववाडी येथे कोपरा सभा संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : आम आदमी पार्टीच्या वतीने चिखली जाधववाडी येथील आहेरवाडी चौक येथे आपच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोपरासभा संपन्न झाल्या. या प्रभागातील आम आदमी पार्टीच्या इच्छुक उमेदवार सिताताई केंद्रे यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा पार पडली. यावेळी बोलतांना सिताताई केंद्रे यांनी प्रभागातील अनेक समस्यांची पोलखोल केली. त्यांनी सांगितले, आम आदमी पार्टीची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता आल्यास महापालिकेत उच्चदर्जाच्या शाळा, दररोज मोफत पाणी देण्यात येईल, महिलांसाठी बस फ्री करण्यात येईल, शास्तिकराचा विषय कायमचा मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी म्हटले.

गेली वीस वर्षे सिताताई केंद्रे त्याप्रभागांमध्ये सामाजिक कार्य करत आहेत, त्यांना स्थानिकांसह ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा या भागांमधून आहे. त्या संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट अध्यक्षा आहेत. यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी बोलतांना म्हटले. महागाईने जनता मेटाकुटीला आलेली आहे येणाऱ्या काळात ही जनता भाजपला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हटले.

यावेळी आपचे प्रवक्ते प्रकाश हगवणे बोलतांना म्हटले, एकेकाळी श्रीमंतीचा रुबाब असणारी महानगरपालिका सत्ताधार्यांच्या कोट्यावधीच्या घोटाळ्यामुळे भिकेचे डोहाळे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आणि विरोधक आणि प्रशासक या महानगरपालिकेमध्ये यांचे लागेबांधे आहेत. अंदर की एक बात है हम सब एक है अशाप्रकारे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असतात. अनेक कामाच्या निविदा वाजवी दरात करून त्यामधून टक्केवारीचे गणित सांभाळणे हा उद्योग ह्या महानगरपालिकेमध्ये सर्रास चालू आहे. अनेक कंत्राटदार महानगरपालिकेच्या कामामुळे गर्भ श्रीमंत झाले आहेत. आपची महापालिकेत सत्ता आली तर हा भ्रष्टाचार मोडीत काढला जाईल.

यावेळी शहर आप चे डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ.अमर डोंगरे, राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे, आप युवा नेते भीम मांगडे, ब्रह्मानंद जाधव, रनावरे ताई, आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शब्दात भाजप सरकारचे वाभाडे काढले.

यावेळी आम आदमी पार्टीचे कमलेश रणावरे, सुरेश बावनकर, सुनील शिवशरण, सुरेश भिसे, बालाजी कांबळे, ओम डांगे, दत्तात्रय सांगवे, मेघा गरिबे, भाग्यश्री टोम्पे, प्रथमेश बोरुळे, सुरेश कांबळे, अनिल टाकळे, राहुल कांबळे, सुजित रजपूत, आकाश कवठेकर, तुकाराम इंगोले, गुलाब कांबळे, शिवराज इंगोले, विष्णू घोरवाड, वैभव कौशल्य, राजू इंगोले, वैभव इंगोले, गजू इंगोले, साईनाथ इंगोले, मधुकर काउटकर, देवी इंगोले, प्रभाकर इंगोले, विठ्ठल सावंत, पवन इंगोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माया सांगवे यांनी आभार व्यक्त केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय