Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

लग्नातील जेवणाच्या पंगतीत वाढप्यावर चाकूहल्ला कारण एकूण थक्क व्हाल..

यवतमाळ : लग्नाच्या पंगतीत बसून जेवणाचा आनंद घेत वाढप्यांना त्रस्त करणाऱ्याला पंगतीतून उठविले. यामुळे संतापलेल्या दाेघांनी थेट चाकूने हल्ला केला.ही घटना बाेरीसिंह येथे शुक्रवारी रात्री घडली. हल्लेखाेरांपैकी एक ग्रामस्थांच्या हाती लागला. त्याला चांगलाच चाेप दिला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी आहे.

राहुल नंदकिशाेर केसलकर, असे जखमीचे नाव आहे. दिनेश लक्ष्मण बहिरम यांच्याकडे भाचीचे लग्न हाेते. या लग्नात यवतमाळातील पाहुणे मंडळी आली हाेती. त्यांना पंगत बसवून जेवण देण्यात आले. गावातील युवक पंगतीत वाढण्याचे काम करत हाेते. दाेन ते तीन पंगती उठल्या तरी एक युवक जागेवरून उठण्यास तयार नव्हता. त्याला समजावून सांगितल्यानंतरही ताे वाढप्यांना त्रास देत होता. शेवटी त्याला खडसावून पंगतीबाहेर काढले.

यामुळे ताे युवक संतापला, त्याने त्याच्या भावाला बाेलावून घेतले. नंतर हाच ताे उठविणारा म्हणत राहुल केसलकर याच्यावर चाकूने हल्ला केला. राहुलच्या पाठीत चाकू भाेसकला, या झटापटीत हल्लेखाेरापैकी एक हाती लगाला. त्याला ग्रामस्थांनी बदडून काढले. नंतर वडगाव जंगल पाेलिसांच्या ताब्यात दिले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles