Friday, November 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी कॉलेजमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न

हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त एस.एम.जोशी कॉलेजमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून सप्ताह साजरा करण्यात आला.

शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कॉलेजमध्ये वृक्षारोपण समारंभ, काव्यलेखन स्पर्धा, रक्तदान शिबिर, निबंधलेखन स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आह़े. आज उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, हेल्थ क्लब आणि नोबल हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ.किशोर काकडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, रक्तदानाच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो. रक्तदान हे श्रेष्ठदान आह़े. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होवून देशसेवेचे महान कार्य करावे. असे मत प्र.प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमासाठी नोबल हॉस्पिटल ब्लड बँकेचे डॉ.एस.के. राऊत (संचालक आणि एचओडी. रक्तपेढी), डॉ.दिलीप माने (व्यवस्थापकीय संचालक) उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा.ऋषिकेश खोडदे, डॉ.निशा गोसावी, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा.किसन पठाडे आणि हेल्थ क्लबचे चेअरमन डॉ.अशोक पांढरबळे यांनी केले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय जड़े, डॉ.शहाजी करांडे, डॉ.अजित जाधव, डॉ.सुरेश भोसले, डॉ.अतुल चौरे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय