खेड : एम.आय.डी.सी .प्रादेशिक कार्यालय पुणे येथे खेड सेझ १५ % परतावा धारक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांची भेट घेतली असून या भेटीत १५ % परतावा प्रश्नाबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
मंगळवार दिनांक १७ ऑगस्ट २०२१ रोजी एम.आय.डी.सी. प्रादेशिक कार्यालय, पुणे, येथे संजीव देशमुख यांची नियोजित भेट शेतकरी प्रतिनिधी शिष्टमंडळाने घेतली. या भेटीत पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात सविस्तर सकारात्मक चर्चा घडून आली.
पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या नावे जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, के. डी एल. कडे हस्तांतरित होणारी १४९ हेक्टर जमिनी संदर्भात डीनोटिफिकेशन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे या हस्तांतरित जमिनीला सेझचे नियमलागू न पडता, एमआयडीसी चे नियम लागू पडतील. त्यामुळे त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. एमआयडीसी चे सर्व फायदे शेतकऱ्यांना त्यामुळे मिळतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असाही सल्ला त्यांनी दिला.
एमआयडिसी मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई डॉ. अनबलग हे शेतकऱ्यांच्या या प्रश्नासंदर्भात सकारात्मक असून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. शासकीय स्तरावर शेतकऱ्यांचा हिताचाच विचार होत. असून कोणाचीही फसवणूक होणार नाही खाजगी पातळीवर के. डी .एल. च्या मालमत्तेचा व्यवहार होणार नाही. शासकीय पातळीवरच यासंदर्भात कार्यवाही होईल, असेही त्यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींकडून एमआयडीसी प्रादेशिक कार्यालय पुणे, यांच्याकडून शेतकऱ्यांना आपण आंदोलन करू नये मुख्यमंत्री कार्यालयास मीटिंग संदर्भात कळविले आहे. या आशयाचे दिलेले पत्र याबाबत खुलासा विचारलाअसता. मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई कार्यालयाकडून मीटिंग बाबत प्लॅनिंग चालू असून सध्या माहिती मिळविण्याचे काम चालू आहे. व त्यानंतर मीटिंग घेतली जाईल, अशी माहिती देण्यात आली.
पंधरा टक्के परतावा धारक शेतकर्यांच्या वतीने आयोजित शिष्टमंडळात प्रतिनिधी म्हणून उत्तम कान्हूरकर, विश्वास कदम, काशिनाथ हजारे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, दादा जैद, मारुतराव गोरडे, ऋषिकेश चव्हाण, कीर्तिकुमार छाजेड, संजय नेटके, निलेश म्हसाडे समावेश होता.