Saturday, September 28, 2024
Homeताज्या बातम्याधक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

EVM Viral Video : देशभरात आज लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा पार पडत आहे. देशभरातील 49 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत असताना एकाच वोटरने भाजपला ८ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

उत्तर प्रदेशातील एटामध्ये एका व्यक्तीनं एक नाही, दोन नाही तर तब्बल आठ वेळा मतदान केले आहे. त्याने मतदान करतानाचा व्हिडिओ देखील काढला आहे. या व्हिडिओ मध्ये सदर तरूण तब्बल आठ वेळा भाजपला मतदान करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला घेरले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितलं की, “घटनेचा एफआयआर एटा जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 171-एफ आणि 419, आरपी कायदा 951 च्या कलम 128, 132 आणि 136 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अनेक वेळा मतदान करताना दिसणारा व्यक्ती राजन सिंह, अनिल सिंह यांचा मुलगा असून, खिरिया पमरण गावातील रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.”

EVM Video Viral

दरम्यान, व्हिडिओ समोर आल्यानंतर या तरूणाला अटक करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगानं केली आहे. यासोबतच या व्यक्तीनं ज्या पोलिंग बुथवर मतदानाचा हक्क बजावला होता, त्या सर्व सदस्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !

25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम

ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान

पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय