पिंपरी चिंचवड : इतके दिवस मतदार विकत घेतला जातो, आमदार विकत घेतला जातो हे ऐकले, पाहिले होते. परंतु एक गठ्ठा आमदार विकले जातात हे जनतेला पहायला लागले. हा जनतेचा विश्वासघात नव्हे काय? अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली आहे
---Advertisement---
गेले आठवडभर चालू असलेल्या लाथाळ्या पाहता या पुढचा काळ लोकशाहीसाठी कठीण काळ आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. संविधानाने दिलेल्या हक्कांचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठीची लढाई आता जनतेला आपल्या हातात घ्यावी लागेल, असेही बेंद्रे म्हणाले.
– क्रांतिकुमार कडुलकर
---Advertisement---