Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पर्यटकांनी भरलेली बोट मालवण समुद्रात बुडाली

---Advertisement---
संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग : मालवण जवळील तारकर्ली समुद्रात स्कुबा डायविंग करून परतीच्या मार्गावर किनारी येताना 20 पर्यटकांना घेऊन येणारी बोट समुद्रात बुडाली आहे. उधाण आलेल्या समुद्रात जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोट एका बाजूला कालांडली आणि त्यातील 20 प्रवासी पाण्यात पडले.

दोघेजणांचा बुडून मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर सहा जणांना मालवणच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 16 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या अपघातातील सर्व पर्यटक पुणे आणि मुंबईचे आहेत.

तारकर्ली हे स्कुबा डायविंग साठी सुप्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण मालवण कोकणमध्ये फिरायला येत असतात. समुद्री खेळासाठी इथे महाराष्ट्रभरातील हजारो लोकांची गर्दी होत असते. स्कुबा डायव्हिंगचे प्रमुख आकर्षण असलेल्या मालवणला गेल्या काही काळापासून तारकर्लीला पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे. सदर प्रकरणाची पोलिस यंत्रणा असून चौकशी करत आहे.

महागाई, बेरोजगारी विरोधात डावे पक्ष मैदानात, देशव्यापी आंदोलनाचा नारा

नोकरीच्या शोधात आहात ? ‘या’ 32 ठिकाणी सरकारी, निमसरकारी विभागात सुवर्णसंधी संधी ! अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत “इतक्या” पदांसाठी होणार भरती – अजित पवारांचे सूचक वक्तव्य


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles