Thursday, September 19, 2024
Homeराज्यराज्यसभेच्या निवडणुकी अगोदरच महाविकास आघाडीला मोठा धक्का

राज्यसभेच्या निवडणुकी अगोदरच महाविकास आघाडीला मोठा धक्का

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहे.

या निवडणूकीत एकेक मत राजकीय पक्षासाठी महत्वाचे आहे. असताना महाविकास विकास आघाडीचे नवाब मलिक (nawab malik) आणि अनिल देशमुख (anil deshmukh) हे दोन मंत्री तुरुंगात आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या नेत्यांच्या मतदानाच्या परवानगीवर ईडीने देखील आक्षेप घेतला होता. आता न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता यावं यासाठी राष्ट्रवादीने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयात आज फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मलिक आणि देशमुख यांना मोठा दणका बसला आहे. त्यामुळे उद्याच्या मतदानात अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार की नाही यावर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख

लोकप्रिय