Amravati : अमरावती लोकसभा (Amravati loksabha) मतदार संघात भाजपकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस, प्रहार चे देखील उमेदवार मैदानात असणार आहे. वंचितने देखील अमरावती लोकसभा मतदारसंघातून कु. प्राजक्ता पिल्लेवान यांचे नाव जाहीर केले आहे. अशात आता याच मतदार संघात आंबेडकर यांच्या कटूंबातून आणखी एक उमेदवार मैदानात उतरले आहेत.
अमरावती लोकसभा (Amravati loksabha) मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छून आहेत. या आधी भाजप, काँग्रेस, प्रहार, वंचित ने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी देखील अमरावती मतदारसंघावर दावा सागितला आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांची रिपल्बिकन सेना देखील निवडणूकीच्या रिंगणात असणार आहे.
काय म्हणाले आनंदराज आंबेडकर
आंबेडकर चळवळीतील लोकांची ईच्छा होती मी निवडणुक तिथून लढावी, त्यामुळे आपण निवडणूक लढवत आहोत. या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचं लक्ष नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच आपण स्वतः अमरावती लोकसभा मतदार संघातून 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहे, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की मी अमरावती मधून निवडणूक लढावी, जरी तिथं वंचितचा उमेदवार असला तरी मी अमरावती मधूनच निवडणूक लढणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये यासाठी महायुतीतील अनेकांनी विरोध केला होता. यामुळे महायुतीतील संबंध देखील चांगलेच ताणल्याचे बघायला मिळाले.अशा सर्व परिस्थित भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्यावतीने दिनेश बुब यांना अमरावतीच्या मैदानातून रिंगणात उतरवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार अशीच चिन्हं आहेत.
हे ही वाचा :
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्यांचा मृत्यू
ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!
मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध
अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश
मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर