Wednesday, February 12, 2025

PCMC : महापालिका विभागांमध्ये आता कागद विरहीत (PAPER LESS) कार्यप्रणाली

पाच प्रणालींचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते अनावरण; ३५ विभागाचा कारभार होणार ऑनलाईन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर: पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार आता कागदविरहीत (पेपरलेस) होणार असून प्रशासनाने त्या दिशेने पाऊल टाकले आहे. महापालिकेत जीएसआय सक्षम ईआरपी प्रणालीमुळे सर्व कारभार ऑनलाईन करण्यावर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी भर दिला असून, विवाह नोंदणी प्रणाली, प्रेक्षागृह, नाट्यगृहे बुकींग, ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली, माहिती अधिकार प्रणाली, पशुवैद्यकीय व्यवस्थापन या विभागाच्या जीएसआय सक्षम ईआरपी  प्रणालीचे अनावरण मंगळवारी स्थायी समिती सभागृहात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजय खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी ‍किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत जीआयएस सक्षम ईआरपी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

नागरी सेवा-सुविधा, सर्व फाईल्सचे कामकाज ऑनलाईन दिसणार आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी – कर्मचा-यांचे श्रम वाचून व्यवहारात पारदर्शकता येणार असून फाईलला देखील दिरंगाई लागणार नाही.
क्षेत्रीय कार्यालयातील विवाह नोंदणी प्रमाणपत्र, सर्व नाट्यगृहाचे बुकींग, ग्रंथालये, पशुवैद्यकीय विभागातील श्वान परवाने, माहिती अधिकार अर्ज (आरटीआय), विविध विभागाचे कागदविरहित (पेपरलेस) ऑनलाईन कामकाज करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ विभागाचे कामकाज ऑनलाईन केलेले आहे. यापुढे अन्य उर्वरित विभागाचे कामकाज देखील ऑनलाईन करण्यात येणार आहे.
माहिती अधिकाराची प्रक्रीय सुलभ 
माहिती अधिकार ऑनलाईन प्रक्रीयेत ऑनलाईन अर्ज करून माहिती मागविता येईल. विभागानुसार माहिती मागविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, यामुळे ‍विभागांचा वेळ वाचणार आहे.

पारदर्शक प्रशासन व कामकाजाला गती मिळणार आहे.

महापालिकेच्या सर्व विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करणे, नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ होण्याच्या दृष्टीने मनपा व स्मार्ट सिटी यांच्या वतीने जीआयएस सक्षण ईआरपी प्रणाली सुरु केली आहे. पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही प्रणाली कार्यरत करण्यात येत आहे. यामुळे, संबंधित विभागातील अधिकारी – कर्मचारी यांना निर्णय घेणे सोपे होणार आहे. तसेच, कामकाजाला गती मिळणार आहे.

– शेखर सिंह, आयुक्त – पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles