Wednesday, February 12, 2025

PCMC: विद्वान संशोधकानी भारताचा खरा इतिहास सप्रमाणात आणण्याचे मौखिक कार्य केले पाहिजे-अभिजीत जोग

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:”भारत हा जगाच्या पाठीवरील बहुधा एकमेव देश असेल ज्याचा प्राचीन वैभवशाली इतिहास नेहमीच मोडतोड करून, मोठय़ा प्रमाणात दिशाभूल करून सादर करण्यात आला आहे. PCMC वेगवेगळय़ा कालखंडात, वेगवेगळय़ा शक्तींनी, वेगवेगळय़ा कारणांसाठी हे कार्य केलेलं असलं तरी त्यांचे स्वार्थ एकमेकांशी जुळत असल्यामुळे गेली १५०-२०० वर्षे ही दिशाभूल अविरत सुरूच आहे. PCMC news

विद्वान संशोधकानी  मूलभूत संशोधनाच्या आधारे हिंदुस्तानचा खरा इतिहास सप्रमाणात आणण्याचे मौखिक कार्य केले पाहिजे.असे प्रतिपादन लेखक अभिजीत जोग यांनी निगडी प्राधिकरण येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयाद्वारे आयोजित केलेल्या वाचक मेळाव्यात केले.

भ्रामक संशोधन व गुलामगिरीचे शिक्षण यामुळे अनेक पिढय़ामध्ये न्यूनगंड

एखाद्या राष्ट्राचा समूळ नाश करण्यासाठी केवळ शस्त्रबलाने जिंकणे पुरेसे नसते, तर त्या राष्ट्राच्या जनतेची बौद्धिक धारणाच संपवून टाकणे आवश्यक असते असे आर्य चाणक्याने म्हटले आहे. हिंदुस्थानचा खरा इतिहास भ्रामक संशोधन व गुलामगिरीचे शिक्षण यांच्या माध्यमातून डागाळण्याचे व सपशेल डावलण्याचे षडयंत्र गेली दोन शतके अत्यंत चलाखीने व बिनबोभाट चालू असून त्यामुळे अनेक पिढय़ा न्यूनगंडाने पछाडून गेले हे या देशाचे वास्तव आहे. अभिजित जोग यांनी वाचक मेळावाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या व्याख्यानातून चुकीच्या इतिहासावर बोट ठेवून वास्तविकता काय आहे याकडे लक्ष वेधले.

कार्यक्रमाचा शुभारंभ भारतमातेच्या प्रतिमापूजनाने झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अपर्णा देशपांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व अध्यक्ष विश्वनाथ नायर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ग्रंथालयाच्या अध्यक्षा गीता खंडकर यांनी स्वागत व प्रस्तावना केले, विश्वास करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.सतीश सगदेव यांनी वाचनालयाच्या संदर्भात केलेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणाचे विश्लेषण व अंमलबजावणी संदर्भात विस्तृत माहिती दिली.

दरम्यान सालाबादप्रमाणे दोन संस्थांना सुनीती विद्यालय, देहू व स्वर्गीय तात्याबापट स्मृती समिती (सेवा विभाग) यांना ग्रंथालयासाठी पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.उत्तरार्धात श्रोते व वाचकांनी अभिजीत जोग यांच्याशी प्रश्नोत्तरे करून संवाद साधला.

वनिता राईलकर यांनी आभार व्यक्त केले व सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्यकारणी सदस्य, सर्व विभागाचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक व वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त

ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका

मोठी बातमी : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय… उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

Related Articles

- Advertisement -

Latest Articles