महिला दिनानिमित्त मनसेकडून महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर: दि.८-महिला कर्मचाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवत मोठे योगदान आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या.
राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना सचिन चिखले म्हणाले की,
महिला सफाई कर्मचार्यांमुळे पिंपरी चिंचवड शहर नेहमीच स्वच्छ व सुशोभित राहिले आहे. कोरोना महामारीच्या काळात, लॉकडाऊनमध्येसुध्दा त्यांनी अखंडितपणे आपले कार्य सुरु ठेवले होते.त्याबद्दल त्यांचे मानावेत तितके आभार कमीच आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण महिलासेने कडुन अभिनव उपक्रम
मोरवाडी चौक अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालुन मोरवाडी चौकातील सर्कल ला पुर्ण दिव्यांनी व रांगोळी ने सुशोभित करुन हुत्तात्मा महिलांचे फोटो चौकातील सर्कल मधिल कॅालम ला लावण्यात आले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240309-WA0011-768x1024.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240309-WA0012-1024x768.jpg)
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या महिला सदस्या, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी कैलास मांढरे,जयवंत दूधभाते, शुभम मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.