Wednesday, February 12, 2025

PCMC : महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा सन्मान.

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर :दि.८ – जागतिक महिला दिन हा समानतेचा आणि हक्काची व न्यायाची लढाई पुनर्जीवित करण्याचा हा दिवस महिलांना संविधानिक,सन्मान व समान संधीचा अधिकारासाठी होत असलेल्या लढाईला बळ देणारा हा दिवस म्हणून आज कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला .


राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाकडून आज सन्मान करण्यात आला .

राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष ,कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने,नाना कसबे, सलीम डांगे, सैफुल शेख,तानाजी वाघमारे, महादेव गायकवाड आदीं उपस्थित होते.

नखाते म्हणाले की कष्टकरी महिला या संसारिक,आर्थिक अडचणीचा सामना करत जिद्दीने पुढे जात आहेत सामाजिक संघटना व कामगार चळवळीत ही महिलांचे संख्या लक्षणीय आहे. कष्टकरी वर्गामध्ये महिला या पुरुषांसोबत मेहनतीचे काम करत असून सुद्धा वेतनाबाबत दूजाभाव केला जात आहे तो दुर करण्यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे असून जिद्दीने लढणाऱ्या महिलांना सलाम आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles