Wednesday, February 12, 2025

…तर आम्ही भाजप सोबत जाऊ, उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

Uddhav thackeray : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सर्व पक्ष ताकदीने तयारीला लागले आहेत. भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी देश पातळीवर इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. तर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार लढत होणार आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.

मुंबईतील धारावी येथे झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी आम्ही तुमच्यासोबत येतो म्हणत भाजपलाचा आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आठवर्षापूर्वी सव्वा लाख कोटीचं पॅकेज मोदींनी बिहारला जाहीर केलं होतं. त्यापैकी किती आले. आले असती तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासबत येतो. मोदींचा फसवी फसवीचा खेळ सुरू आहे. आम्हीही दोनदा मोदींच्या भूलथापांना बळी पडलो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

याआधी नरेंद्र मोदी आणि भाजपने आपकी बार मोदी सरकार असा नारा लावला होता. त्यानंतर अच्छे दिन आऐंगे असा नारा लावला होता. मात्र अच्छे दिन आलेच नाहीत. यांनी फक्त नावं बदललं. योजनांची नावे बदलली. काही काम केलं नाही. जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवलं आहे. भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या तुमचं वाकडं होणार नाही. ही मोदी गॅरंटी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles