मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा उपक्रम
पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पिपंरी चौक येथे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.27 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्याचे सचिन चिखले यांनी ठरवले ते म्हणाले, की,
आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. आम्ही सर्व मराठी भाषिक नागरिकांनी ‘मी मराठी माझी स्वाक्षरी’ या उपक्रमा अंतर्गत हा दिन साजरा करण्याचे ठरवले.

दि.27 फेब्रुवारी रोजी मराठी दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आंबेडकर चौक पिंपरी येथे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली त्यामध्ये अनेक मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी प्रतिसाद दाखवून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मराठी स्वाक्षरी केली.
मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या घोषणा देऊन सर्व पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांना आव्हान करतो की महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आपण महाराष्ट्राचा गौरव म्हणून व महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी जो न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याप्रमाणे कायद्याचे उल्लंघन न करता लवकरात लवकर आपल्या दुकानावरच्या पाट्या मराठीत लावा जाहीरपणे व्यापारी संघटनेला सांगण्यात आले त्वरित पाट्या बदला अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलनाला शहरात उभे राहील पिंपरी चिंचवड शहरात ज्या दुकानावर मराठी पाट्या आहेत त्या दुकानदारांंचा निगडी प्राधिकरण येथे सत्कार करण्यात आला अशा प्रमाणे आज मराठी राज्यभाषा दिन अतिशय उत्कृष्टपणे शहरात साजरा झाला.

या अभिनव कार्यक्रमामध्ये अध्यक्ष सचिन चिखले,,रुपेश पटेकर,राजू सावळे,बाळा दानवले,राजू भालेराव,शैलेश पाटील,अनिता पांचाळ,वैशाली बोत्रे,नितीन चव्हाण,जयसिंग भाट,नारायण पठारे,केके कांबळे,शिशिर महाबळेश्वर,सतीश झारखंड,आकाश सागरे,उल्हास जयकर,जितेश वाल्लेकर,वैशालीताई कोराड,चेतन कुलकर्णी,कैलास दुर्गे,आप्पा कांबळे,शुभम सातपुते,पवन सुरेश,आकाश पांचाळ आदी मनसे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मराठी दिन उत्साहात साजरा केला.