Thursday, November 21, 2024
Homeराज्यतासाभरात मिळतोय प्रवासाठीचा ई-पास ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न

तासाभरात मिळतोय प्रवासाठीचा ई-पास ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न

 सोलापूर, दि. २४ : कोरोना विषाणूच्या काळात सोलापुरात अडकून पडलेल्या मजूर, गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा कामावर हजर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-पास काढावा लागतो. पूर्वी चार-पाच दिवस लागणारा कालावधी आता एका तासावर आला असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. दरदिवशी दोन ते अडीच हजार अर्ज प्राप्त होत असून ३० जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 लॉकडाऊनमुळे सोलापूर ग्रामीण भागात अडकून पडलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक, भाविक आणि नोकरदार यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी १ मे २०२० पासून ऑनलाईन ई-पास दिला जात आहे.

     ई-पासविषयी अधिक माहिती देताना उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मोहिनी चव्हाण यांनी सांगितले की, आज २३ जून २०२० दुपारी १२ वाजेपर्यंत ग्रामीण भागात एक लाख २९ हजार ८८० अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन आले आहेत. १ लाख ११ हजार ७१३ अर्जांना मंजुरी दिली असून १७ हजार ४७८ अर्ज नाकारले आहेत. मंजूर अर्जामध्ये सुमारे ९७ हजार अर्ज हे सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तर १६ हजार परवानग्या ह्या परराज्यात जाण्यासाठी देण्यात आल्या आहेत. ६७१ प्रलंबित अर्ज हे आज मंजूर होतील.

मजुरांना रेल्वेबरोबर एसटीचाही आधार

    परराज्यातील मजूर जिल्ह्यात अडकून पडले होते. सामाजिक संस्थांच्या मदतीने सर्व मजुरांना एकत्र करणे, त्यांची संपूर्ण माहिती संकलन करणे, अन्न-पाण्याची व्यवस्था करून गट करण्यात आले होते. परराज्यांची परवानगी मिळाल्यानंतर शहर व जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ८४५ मजूर ९ रेल्वेगाड्यांद्वारे आपापल्या राज्यात पाठविण्यात आले. एसटीने (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) 1

१४७८ मजूरही रवाना करण्यात आल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांना ऑफलाईनचा आधार

     नंदूरबार, रायगड या भागातील ४६१ आदिवासी बांधव जिल्ह्यात अडकून पडले होते. विशेष बाब म्हणून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ऑफलाईन परवानगी दिली जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे असलेल्या याद्यामधून ४६१ आदिवासी बांधवांना परवानगी देण्यात आली. शिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठीही ऑफलाईनची मदत घेण्यात येऊन ८ हजार ७०१ नागरिकांना परवानगी देण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय