Sunday, November 24, 2024
Homeजिल्हापाटस टोल प्लाझा येथे 35 व्या रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत रक्तदान शिबिराचे...

पाटस टोल प्लाझा येथे 35 व्या रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन

पाटस : टोल प्लाझा येथे पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रा. लि .व रोटरी ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने 35 व्या रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी 40 रक्ताच्या बॅग चे संकलन झाले . या कार्यक्रमासाठी ऑटोस्टेडचे संचालक शशी कुमार भाटिया, मुख्य वित्त अधिकारी हरीश अग्रवाल, श्रीधर बोया, पुणे सोलापूर एक्सप्रेस वे चे ऑपरेशन मॅनेजर रविकुमार मारवाडी, प्लाझा मॅनेजर अनिल शिंनुर, लीगल ऑफिसर एडवोकेट योगेश सरोदे,सिस्टीम मॅनेजर समाधान पवार, एच आर मॅनेजर राजेश सिंग, ऑडिटर अमरजीत सिंग कुशवाह, रोटरी ब्लड बँकेचे इन्चार्ज नारायण पाटील, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद रोटे ,प्रोजेक्ट मॅनेजर दिलावर मुल्ला, इरफान शेख ,गुलाब शेख, स्वतंत्र अभियंता विनोद कुमार, स्वागत गायकवाड व इतर स्टाफ उपस्थित होता.



या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शशिकुमार भाटी सर यांनी रीबन कापून केले या शिबिरामध्ये पाटस टोल प्लाजा चे अधिकारी कर्मचारी व काही स्थानिक नागरिक यांचे माध्यमातून 40 रक्ताच्या बॅगचे संकलन झाले . तसेच 14 फेब्रुवारी याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाल्याकारणाने शहिदांना श्रद्धांजली व्यक्त करत काही मिनिटे मौन बाळगण्यात आले.अशाप्रकारे उपस्थितांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे आयोजित केलेले रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले .



रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना रोटरी ब्लड बँक यांचे वतीने प्रशस्तीपत्रक व हेल्मेट चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी रोटरी ब्लड बँकेचे इन्चार्ज नारायण पाटील, पूजा शेलार, नेहा कारभारी ,आरती कांबळे, स्वाती वट्टे ,योगेश नगरे, प्रीती रोडगे यांचे सहकार्य मिळाले.

संबंधित लेख

लोकप्रिय