Tuesday, December 3, 2024
HomeNewsPCMC:शासनाच्या विविध योजना आता लघु व मध्यम उद्योगाच्या दारी -सूर्यकांत मुळे

PCMC:शासनाच्या विविध योजना आता लघु व मध्यम उद्योगाच्या दारी -सूर्यकांत मुळे

ऑटो क्लस्टर पिंपरी येथे आज(दि.9 फेब्रुवारी) कार्यक्रम

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:तीस वर्षापासून विविध नामांकित उद्योगाच्या मानव संसाधनाच्या विविध जबाबदार पदावर काम करत शासनाच्या अनेक विविध योजना विविध उद्योगात राबवताना आपण आपल्या सोबत परिसरातील अनेक मध्यम छोट्या उद्योगांना ही शासनाच्या नियमित चालू असलेल्या अनेक योजना उद्योजकांना समजावून सांगून त्यांना सक्षम होण्यासाठी मदत होईल शासनाच्या विविध योजना अनेक मध्यम उद्योगापर्यंत पोहोचल्याने एक औद्योगिक क्षेत्रात प्रगतीचे वातावरण निर्माण होईल व देशातील मोजक्या मोठ्या उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा अनेक पटीने अधिक अशी संख्या मध्यम उद्योगात कार्यरत आहे आणि त्यांना गरज पण आहे म्हणून प्रत्येक समाज मोठ्या उद्योजकाकडे आकर्षित होतो पण लघुउद्योजकांना आज अनेक प्रश्न भेडसावत आहेत,देशात बेरोजगाराही आहे, छोट्या उद्योगांना काम करणारी माणसे मिळत नाहीत हे विषमता या देशांमध्ये आहे म्हणूनच अनेक योजना उद्योगापर्यंत पोहोचवून त्यांना सांगून समन्वय साधून उद्योगांना सक्षम करण्याचा हा एक प्रयत्न आहे म्हणून दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता ऑटो क्लस्टर पिंपरी पुणे येथे मार्गदर्शनपर विशेष योजनांचे मार्गदर्शन करण्याचे कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या उद्योगांमध्ये शासनाचे विविध योजना राबवणारे अधिकारी हजर राहून उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत त्याचा लाभ प्रत्येक उद्योजकांनी घ्यावा या कार्यक्रमात सहभागी व्हावं त्याची माहिती घ्यावी आणि आपला उद्योग सक्षम करावा हाच या उपक्रमातून एक साधा प्रयत्न आहे.

इंडस्ट्री सपोर्ट ऑर्गनायझेशन पुणे .
सूर्यकांत मुळे संचालक
+919970196146

संबंधित लेख

लोकप्रिय