पिंपरी चिंचवड:मातंग साहित्य परिषद, पुणे आयोजित दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाचे उध्दघाटन सुप्रसिद्ध उद्योजक गारवे हुंडाईचे संचालक किरण गारवे यांच्या हस्ते
करण्याचे निश्चित करण्यात आहे.किरण गारवे हे पिंपरी चिंचवड शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते आहेत.गारवे कुटूंब गेले अनेक वर्षांपासून आटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहेत.किरण गारवे हे काही काळ प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते.
हेमंतजी हरहरे यांच्या हस्ते मातंगऋषी साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून पत्र देण्यात आले.यावेळी मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे उपस्थितीत होते.
या साहित्य संमेलनाचे आयोजन राजवाडा लॉन्स,राजवाडेनगर,तापकीरमळा,चौकाजवळ,पवनेश्वर मंदिर रोडलगत,काळेवाडी,पिंपरी,पुणे-१७ येथे दि.११/०२/२०२४, रविवार रोजी करण्यात येणार आहे.हे साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे ह्यांच्या अध्यक्षतेखाली व स्वागताध्यक्ष मा.शंकर जगताप(अध्यक्ष,भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा) ह्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
PCMC:दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाचे उध्दघाटन सुप्रसिद्ध उद्योजक किरण गारवे यांच्या हस्ते
- Advertisement -