Wednesday, February 12, 2025

जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याला मोबाईलवर गर्लफ्रेंड शी बोलताना रंगेहाथ पकडतात तेव्हा..

असाही एक काळ होता जेव्हा वर्गात शिक्षक आल्यावर विद्यार्थी एकदम शिस्तबद्ध व्हायचे. वर्गात दंगा करायचे नाही आणि इतर रिकाम्या गोष्टी करायचे नाहीत. मात्र आता शिक्षकांविषयीची भीती विद्यार्थ्यांच्या मनात राहिली नाही. शिक्षक वर्गात असल्यावरही विद्यार्थी नको त्या गोष्टी करताना दिसून येतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आलाय जो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय.शिक्षक वर्गात असल्यावरही आजकालचे विद्यार्थी इतर गोष्टी करताना आढळून येतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळाला. शिक्षक वर्गात असतानाही एक विद्यार्थी फोनवर गर्लफ्रेंडशी बोलत होता.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वर्गामध्ये एक मुलगा बेंचवर डोकं ठेवून गर्लफेंडशी बोलत होता. तेवढ्यात शिक्षक येतात आणि त्याच्यासमोरच्या बेंचवर बसून त्याच्याकडे एकटक पाहतात. बाकीचे विद्यार्थीही हसत असतात आणि काहींना हे दृश्य कॅमेऱ्यात कॅप्चर केलं. फोन ठेवल्यावर विद्यार्थी उठतो आणि डोकं वर घेतो तोच त्याला शिक्षक दिसतात. अचानक शिक्षकांना समोर पाहून तो घाबरतो आणि सगळे विद्यार्थी मोठ्याने हसायला लागतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या असून मजा घेतली आहे. अनेकांना ते शाळेत असतानाचे दिवस आठवले आणि त्यांनी कमेंटमध्ये त्यांचाही किस्सा शेअर केला.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles