श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठानिमित्त : व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ यांच्या हस्ते आरती
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:अयोध्येतील श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठेनिमित्त सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी एच.ए कॉलनी, पिंपरी येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सुश्री निरजा सराफ, एमडी एचएएल यांच्या हस्ते आरती झाली.
---Advertisement---

H.A कॉलनी येथे भगवान श्री राम प्राण प्रतिष्ठा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11.00 ते 11.10 या वेळेत उपस्थितांचे स्वागत व श्री राम मंदिराची माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

सकाळी 11.10 ते 11.20 पर्यंत व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ व कर्मचाऱ्याकडून श्रीराम मूर्ती आणि कलशाचे पूजन करण्यात आले.
---Advertisement---