Thursday, March 13, 2025

ब्रेकिंग : सरकारचा निषेध करीत निघणार रविवारी कामगारांची पुणे – मुंबई दुचाकी रॅली

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे-मुंबई दुचाकी रॅलीत कामगारांनी सहभागी व्हावे कामगार संघटनांचे आवाहन

पिंपरी चिंचवड : प्रचलित कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने चार नवीन कायदे करून देशभरातील सर्व संघटित, असंघटित कामगारांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षितता धोक्यात आणली आहे त्याचा निषेध सर्व कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. हे कामगार कायदे रद्द करावेत आणि पूर्वीचेच कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कामगार संघटना रविवार दिनांक 1 मे रोजी पुणे मुंबई दुचाकी रॅली काढून निषेध करणार आहेत. 

पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून या रॅलीस रविवारी सकाळी ६ वाजता सुरुवात होणार आहे. दुपारी तीन वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे या रॅलीचे सभेत रूपांतर होईल. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे, कामगार नेते अनिल रोहम, वसंत पवार आदी उपस्थित होते.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !

यावेळी डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि महात्मा फुले पुतळा तसेच महात्मा गांधी आणि कामगार संघटनांचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण कतून या रॅलीची सुरुवात होईल. या रॅलीमध्ये पिंपरी चिंचवड सह पुणे जिल्ह्यातील सर्व भागातील कामगार संघटना आणि रायगड, ठाणे, नवी मुंबई व मुंबईतील कामगार कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील. पिंपरीतून किमान एक हजार दुचाकी रॅली मुंबईकडे निघतील. आझाद मैदान पर्यंत  त्यांची संख्या पाच हजार पेक्षा जास्त होईल. 

देशभरातील कोणत्याही कामगार संघटनांची मागणी नसताना कोरोना काळात देशभर सर्व उद्योग व्यवसाय ठप्प असताना केंद्रातील भाजप सरकारने विरोधी पक्षांना किंवा कोणत्याही कामगार संघटनांना विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने नवीन कामगार कायदे संसदेमध्ये संमत केले. हा देशातील कष्टकरी कामगारांचा विश्वासघात आहे या नवीन कामगार कायद्यांमुळे कायम कामगार ही संज्ञा नष्ट होणार असून भविष्यात सर्व पिढ्यांचे आर्थिक, सामाजिक स्थैर्य यामुळे संपुष्टात येणार आहे. पूर्वीचे कामगार कायदे लागू करावेत यासाठी आणि कामगारांना सामाजिक, आर्थिक, सुरक्षितता मिळावी या मागणीसाठी रविवारी होणाऱ्या या पुणे – मुंबई दुचाकी रॅलीमध्ये सर्व संघटित व असंघटित कामगारांनी सहभाग घेऊन केंद्र सरकारचा निषेध करावा असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी या वेळी केले.

Pune Nokari : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती

यावेळी ज्येष्ठ कामगार नेते मानव कांबळे म्हणाले की, या रॅलीमध्ये पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीच्या अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभाग घेणार आहेत. पुणे, रायगड, ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगर या परिसरातून हजारो कामगार या रॅलीत सहभाग घेतील आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवतील.

– क्रांतिकुमार कडुलकर


Related Articles

- Advertisement -

Latest Articles