Saturday, March 15, 2025

बंगळुरुमध्ये सोशल मीडिया पोस्टवरुन हिंसाचार; जवळपास २००-२५० गाड्या जाळल्या

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये सोशल मीडिया पोस्टवरुन हिंसाचार झाला आहे. कॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मुर्ती यांच्या भाच्याने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर हा हिंसाचार घडला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी फायरिंग केली असून त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, पोलिसांच्या गाड्याही जमावाने जाळल्या आहेत. जवळपास २००-२५० गाड्या जाळल्या असल्याचे माहिती पोलिस कमिशनर कमल पंत यांनी दिली आहे. सोशल मीडियावर मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह्य पोस्ट लिहिल्यामुळे काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याला अटक करण्यात आली आहे.

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समुदायातील शेकडो लोकांनी श्रीनिवास मूर्ती यांच्या घरासमोर गर्दी केली. संतप्त जमावाने मूर्ती यांच्या घरावर दगडफेक केली. इतकेच नाही तर तिथे असलेल्या गाड्यांना आगही लावली. त्यानंतर संतप्त जमावाने आपला मोर्चा डीजे हल्ली पोलीस स्थानकाकडे वळवला आणि तिथे तोडफोड केली.

संतप्त जमावाची आक्रमकता आणि उफाळलेला हिंसाचार शांत करण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली. या फायरिंगमध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles