मुंबई : राज्यात ९ हजार ११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या १ लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख २५ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.