अंबाजोगाई : येथील कोरोना रुग्णांना अवेळी आणि निकृष्ट नाश्ता जेवण दिले जात असल्याची ओरड होती. तहसिलदारांनी पहाणी करत कंत्राटदाराला २५ हजारांच्या दंडाची शिफारस जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
अंबाजोगाई येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना वेळेवर नाश्ता आणि जेवण दिले जात नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या होत्या. त्यासोबतच दिले जाणारे अन्न हे निकृष्ट दर्जाचे असल्याचीही ओरड होती. त्यामुळे तहसीलदार संतोष रुईकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यामुळे कंत्राटदार अब्दुल गणी यांच्याकडून २५ हजारांचा दंड वसूल करण्यात यावा अशी शिफारस तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.