Friday, March 14, 2025

खुशखबर : राज्यात होणार मेगा पोलीस भरती, मंत्रिमंडळाची मंजुरी गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मुंबई : राज्यात 12,528 पोलिसांच्या मेगा पोलीस भरतीसाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार. लवकरच राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील उपरोक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले.

मेगा पोलीस भरती

पोलीस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे.

पोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे व मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles