Saturday, March 15, 2025

मागेल त्याला काम द्या; किसान सभेची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी.

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

जुन्नर : मागेल त्याला काम द्यावे या मागणीसह विविध मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच मनरेगाच्या अंमलबजावणी लढा तीव्र करण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.

किसान सभेच्या पुढाकारातून तालुक्यात ११ गावामध्ये मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवडीची कामे झाली आहेत तर १ गावामध्ये वृक्ष लागवडीचे काम चालू आहे. या गावांमध्ये काम चालू करण्यासाठी मजुरांना प्रशासनाशी संघर्ष करावा लागला आहे. मनरेगाची कामे ज्या ठिकाणी झाली आहेत त्या ठिकाणाच्या मजुरांच्या वेतन वेळेत न मिळणे अश्या अनेक अडचणी चा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

तालुक्यातील सितेवाडी, सांगणोरे ग्रामपंचायत अंतर्गत कोल्हेवाडी, हिवरे तर्फे मिन्हेर या गावाचे मनरेगा अंतर्गत काम मागणी नुसार वृक्ष लागवडीचे प्रस्ताव ग्रामपंचायतच्या वतीने पंचायत समिती प्रशासनाकडे पाठवून दोन आठवडे होऊनही कामे चालू करण्यात आली नाही. 

यावेळी मागेल त्याला काम मिळावे, सितेवाडी, सांगणोरे ग्रामपंचायत अंतर्गत कोल्हेवाडी, हिवरे तर्फे मिन्हेर येथे वृक्ष लागवडीचे काम त्वरित चालू करावेत, मनरेगा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, मजूरांना कामाचे वेतन वेळेत द्यावे, प्रशासनाने मनरेगाची गावपातळीवर जनजागृती करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास १८ सप्टेंबर २०२० रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे लक्ष्मण जोशी यांनी सांगितले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles