पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो.देशभरात हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. नवरात्री मध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. बांदल वस्ती कुरुळी येथील एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने रासदांडिया व विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती आदमी पार्टी चे संघटन मंत्री व फाउंडेशन चे अध्यक्ष वाजिद शेख यांनी दिली.
बांदल वस्ती येथे नवरात्री निमित्त महिलांसाठी दररोज दांडिया तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते. शेवटच्या दिवशी फाउंडेशन च्या वतीने उत्कृष्ठ दांडिया खेळणाऱ्या महिलांना पैठणी भेट देण्यात आली.
कार्यक्रमात अध्यक्ष वाजिद शेख, उपाध्यक्ष प्रविन निकम, सचिव ज्ञानदेव शिंदे, खजिनदार युवराज भोसले, स्वप्निल मेदनकर,सोपान मोरे,योगेश मोटे, महेंद्रसिगं प्रजापति, श्रीकांत अंबुरे, भरत रसाळ, प्रकाश दाभाडे, साईनाथ मु-हे, कालिदास मु-हे, महेश मु-हे, गणेश मु-हे, सूर्यकांत खटिंग, प्रवीण गायकवाड, परसु अण्णा गाढवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.