Saturday, March 15, 2025

प्रचंड गाजत असलेल्या “मिर्झापुर” वेब सिरीज विरोधात महिला खासदार आक्रमक ; मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे केली हि मागणी

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

उत्तर प्रदेश : नुकताच ‘मिर्झापुर’ या वेबसिरीजचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला असून त्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. मिर्झापुर येण्या अगोदरच सोशल मीडियावर या वेब सिरीजची मोठी चर्चा सुरू होती. मिर्झापुरचा दुसरा भाग 23 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता, मात्र हा भाग 22 ऑक्टोबरलाच प्रदर्शित करून चाहत्यांना अचंबित करण्यात आले. 

उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीवर आधारित असणारी ही वेबसिरीज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वेबसिरीज विरोधात उत्तर प्रदेशच्या मिझापूर जिल्ह्यातील महिला खासदार आणि अपना दल (एस) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांनी ‘मिझापूर’ वेबसिरीजला विरोध केला आहे. या वेबसिरीजमुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ट्विटरवर केली आहे.

खासदार अनुप्रिया पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग करून ‘मिर्झापुर’ वेबसिरीजवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वेबसिरीजच्या माध्यमातून ‘मिझापूर’ हिंसक भाग असल्याचे दाखवून बदनाम केले जात आहे. तसेच जाती जातीत वाद वाढवला जात आहे, असा आरोप अनुप्रिया यांनी केला.

‘मिझापूर -2’ मध्ये दिव्येंदु शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि पंकज त्रिपाठी या सारखे कलाकार असून गुरमीत सिंह आणि मिहिर देसाई यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles