माझा नाही तर श्रमिकांचा जीव वाचवला – कॉ. आडम मास्तर
सोलापूर : २९ एप्रिल २०२० च्या रात्री ८ : ३० ही माझ्या आजवरच्या आयुष्यातील काळीरात्र होती. कारण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून लॉकडाऊन टप्पे वाढू लागले. लोक अन्न पाणी आरोग्य आणि रोजगारांसाठी तडफडत होती.दररोज रात्री कोरोना अपडेट येत असत ते ऐकून माझ्या मनाची घालमेल होत असे. त्या दिवशी स सगळ्या गोष्टींचा माझया मनावर खूप परिणाम झाला, मनावर प्रचंड ताण पडला काही क्षण स्तब्ध झालो आणि माझे रक्तदाब व साखरेची पातळी अचानक वाढून मला भुरळ आली आणि मनाचा ताबा सुटला,शरीराचा तोल गेला तेव्हा सजगता आणि सतर्कता दाखवून माझा जीव वाचण्यासाठी अवघ्या १० मिनिटाच्या आत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मला जाग आल्यावर वाटलं की, म्हणतात ना काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती अर्थातच अजून मला श्रमिकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवायचे आहे तो पर्यंत मी काही मरणार नाही, ते माझ्या आयुष्याचे अंतिम लक्ष्य आहे. तेव्हा या जीवरक्षकांनी माझा नाही तर श्रमिकांचा जीव वाचवला अशा शब्दांत विनम्रतापूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
रविवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बापूजी नगर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेविका कॉ. कामीनीताई आडम यांनी विजय दशमी दसऱ्याचे औचित्य साधून लॉकडाऊनच्या काळात प्रभाग क्रमांक १३ मधील कोविड योद्धाची भूमिका बजावली. तसेच कॉ. नरसय्या आडम मास्तर यांना आपत्कालीन स्थितीत हॉस्पिटलला नेण्यासाठी सहकार्य केले, अशा जीवरक्षकांचा आणि कोविड योद्ध्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मान सोहळा ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रे नगर फेडरेशन च्या चेअरमन नलिनीताई कलबुर्गी यांच्या हस्ते कोविड योद्धा व जीवरक्षकांचा रोख २ हजार रुपये, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जीवनरक्षक डेव्हिड शेट्टी, सुरेश भंडारे, विशाल म्हेत्रे, श्रीनिवास चन्नापागोलू, परशुराम कुमार, नरसिंह म्हेत्रे, एलयजर सातालोलु, आनंद मेंसिलोळू, औदुंबर खटके, नरेश दुगाणे, सचिन सरवदे तर कोविड योद्ध्ये यल्लप्पा भंडारे, मोहन कोक्कुल, नरसिंह बुद्धिमत्ती, व्यकंटेश म्हेत्रे, अनिल भंडारे, विशाल बुगले, नरेश गड्डम, वहिद शेख, सलीम बागवान, जिजा भंडारे, सागर म्हेत्रे, यतीराज सातालोलु, मारुती मेंसिलोलू, अक्षय कोळेकर, राजू आंबेवाले, दिनेश परदेशी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक रे नगर फेडरेशन चे सचिव युसुफ शेख मेजर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले.
तसेच व्यासपीठावरील माजी नगरसेवक माशप्पा विटे, रे नगर फेडरेशन चेअरमन नलिनीताई कलबुर्गी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रभाग क्रमांक १३ च्या लोकप्रिय नगरसेविका कॉ. कामीनीताई आडम यांनी कोविड योद्धा आणि जीवरक्षकांचे विशेष आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक निकंबे, मोहन कोक्कुल, किशोर गुंडला, लक्ष्मीनारायण जोरीगल, दाऊद शेख आदींनी परिश्रम घेतले.