पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : मराठवाडा आदोंलनाच्या चळवळीला पंचाहत्तरी पूर्ण होतायात या निमित्ताने ‘लढा ! मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ! या विशेषांकाचे प्रकाशन प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात पार पडले. यावेळी प्रमुखे पाहुणे व वक्ते राहुल सोलापूरकर यांनी सांस्कृतीक वार्तापत्राच्या विशेषांक कार्यक्रमा निमित्ताने मराठवाड्यात हैद्राबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीने बहुसंख्य हिंदू लोकांवर कसे अत्याचार केले.
अदिवासी भिल्ल लोकांनी प्रथम उठाव केला नंतर अनेक जुलमी राजवटी नंतर क्रांतीकारी व सामान्य जनते पर्यंत आंदोलन पोहचले व स्वातंत्रानंतर दोनच वर्षांनी ह्या संस्थानाचे विलिनिकरण गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी करून घेतले आणि खऱ्या अर्थाने तेथील जनतेला स्वातंत्र्य मिळाले.आपल्याकडे शालेय इतिहासाची दुरावस्था असून सनावळ्यावर भर दिला जातो. सत्य ऐताहासिक घटनां दुर्लक्षित रहातात अशी खंत व्यक्त केली.

अजय तेलंग , पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख यांनी सांस्कृतिक वार्तापत्राची गरज का आहे ? यासंबधी माहीती विषद करीत, वार्तापत्रात हिंदू जनजागृती विषयक माहीती सोबत इतर मुस्लिम धार्मियातील उर्दू वृत्तपत्र सृष्टीतील उत्कृष्ट लेखाचे मराठीत ‘मुस्लिम मनाचा कानोसा ‘ सदराद्वारे लेख प्रसिद्ध केले जातात.असे बहुआयामी वार्तापत्र आहे. कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष के विश्वनाथन नायर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल वजे यांनी केले.


