जुन्नर (पुणे) : कृषी योजना २०२० अंतर्गत कृषी पंप ग्राहकांसाठी थकबाकी व चालू वीज बिलात सूट देण्यासंदर्भात ग्रामपंचायत अलदरे येथे महावितरण जुन्नर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता घुले व आगार शाखेचे सहाय्यक अभियंता कोळी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांंचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी पंप बिल, घरातील बिलां संदर्भात येणाऱ्या समस्यांबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या विविध वैयक्तिक समस्या त्यांनी समजून घेऊन त्यावर मदत करण्याचे आश्वासन दिले.
तसेच ग्रामपंचायत अलदरे यांच्या वतीने शेतकऱ्यांना येणाऱ्या वाढीव बिल संदर्भात समस्या मांडली तसेच नवीन/वाढीव DP चा प्रस्ताव सर्व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला. DP दुरुस्ती साठी मागणी केल्यावर सकारात्मकपणे ही कामे लवकरात लवकर मार्गी लावू असे कोळी यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.